
पैशांचा पाऊस पाडणार असे सांगून वृद्धाची 31 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. भवरलाल पालीवाल आणि गौरीशंकर शर्मा अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
2019 मध्ये गौरीशंकर आणि भवरलाल याने तक्रारदार यांना घरात गाडलेला खजिना शोधण्यासाठी पूजा करावी लागणार आहे असे सांगितले. त्यासाठी आणखी सहा लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. तो खजिना भेटल्यावर पूर्वी आणि खजिन्यातून मिळालेल्या संपत्तीतून काही टक्के रक्कम देणार असल्याचे भासवले. त्यावर विश्वास ठेवून त्याने सहा लाख रुपये दिले. ऑगस्ट 2023 मध्ये भवरलाल हा तक्रारदार यांना भेटण्यासाठी आला. गौरीशंकर यांच्या घरी पूजा करून पैशाचा पाऊस पाडणार असून याची माहिती कोणलाही देऊ नये असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी 15 लाख रुपये खर्च असल्याचे त्याना सांगण्यात आले. डिसेंबर 2023 मध्ये भवरलालने त्याना व्हॉटस्अॅपवर पैशाचा पाऊस याबाबतचा पह्टो पाठवला. ते दोघे तक्रारदार याचे 31 लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ करत होते. तक्रारदार याने चौकशी केल्यावर एक्सरे गॉगल, पैशाचा पाऊस पाडणार नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर केले होते.
लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकाला अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिक्षकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्या शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित मुलगी ही मालाड येथे राहते. ती मालवणी येथील एका ठिकाणी खासगी शिकवणीसाठी जात होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याने पीडित मुलीसोबत नकोसे कृत्य केल्याचा आरोप शिक्षकावर आहे. तसेच त्या शिक्षकाने तिच्यासोबत अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षकाच्या त्रासाला पंटाळून तिने याची माहिती मालवणी पोलिसांना दिली. मालवणी पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली. मालवणी पोलिसांनी शिक्षका विरोधात गुन्हा नोंद केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.





























































