
फ्लाय दुबई विमानातील 170 हून अधिक प्रवाशांचा जीव वाचवणाऱया धाडसी हिंदुस्थानी कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायल पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी काwतुक केले आहे. तीव्र कृतज्ञता व्यक्त करत नेत्यान्याहू यांनी कॅप्टन मच्छार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या (मे 2027) आगामी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केले आहे.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी मच्छार यांच्या धाडसी निर्णय आणि कामगिरीचे वर्णन एका ऐतिहासिक शौर्याचं कृत्य म्हणून केले आहे. एक दुर्मिळ राजनैतिक पाऊल उचलत नेतान्याहू यांनी जाहीर केले. त्यांनी कॅप्टन मच्छार यांच्या पूर्ण प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या.




























































