विमानातील हल्लेखोराचा फोटो आला समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानात हिंदुस्थानी पायलट स्मित माच्छार यांच्यावर हल्ला करणारा आरोपी ओमानी सह-पायलटचा फोटो अखेर समोर आला आहे. हमाम अल-हम्ममी असे या पायटलचे नाव आहे.

अल हम्ममीचा जन्म यूएईमध्ये झाला असून त्याचे वडील ओमानी तर आई सीरियाची होती. त्याने यूएईमध्ये अनेक वर्षे घालवली. 30 सप्टेंबरला कॉकपिटमध्ये हल्ल्याआधी त्याने फ्लाय दुबईसाठी जवळपास 8 महिने काम केले होते. त्याने आधी ओमान एअरसोबत पायलटचे प्रशिक्षण घेतले होते. परंतु, त्याने कट्टरपंथी वेबसाईटला भेट दिल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची डेस्क डय़ुटीवर नियुक्ती करण्यात आली होती.