
जिह्यातील श्री सिटीमधील औद्योगिक परिसरात शनिवारी सकाळी एका फार्मास्युटिकल कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्यामुळे इमारतीच्या छताचा काही भाग खाली कोसळला. रात्रीची शिफ्ट संपवून कामगार बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच अचानक बॉयलरचा जोरदार स्फोट झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली.






























































