
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाह्य चित्रीकरणासाठी मानखुर्द येथील सुमारे 14 एकर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे.
मानखुर्द येथील 14 एकर म्हणजेच सुमारे 56 हजार 666 चौ. मी. जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमीन महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, 1966 मधील कलम 40 नुसार प्राप्त अधिकारात महसूलमुक्त आणि भोगाधिकार मूल्यरहित किमतीने देण्यास सरकारने मान्यता दिली आहे.






























































