अक्षय खन्नाने मलबार हिल परिसरात घेतले नवीन घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

धुरंधर फेम अक्षय खन्ना याने मुंबईतील मलबार हिलमध्ये तब्बल 33.26 कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले आहे. सप्टेंबर 2026 मध्ये या मालमत्तेची नोंदणी करण्यात आली. या अपार्टमेंटसोबत अभिनेत्याला तीन पार्किंगच्या जागाही मिळाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी विभागाच्या (IGR) मालमत्ता नोंदींच्या आधारे ‘स्क्वेअर यार्ड्स’ने ही माहिती दिली आहे. अक्षय खन्ना याने मलबार हिल रोडवरील ’30 लिटल गिब्स’ या इमारतीत हे अपार्टमेंट खरेदी केले आहे. मलबार हिल हा दक्षिण मुंबईतील महागड्या निवासी परिसरांपैकी एक असून, आलिशान घरे आणि प्रतिष्ठित निवासी इमारतींसाठी तो ओळखला जातो.

‘धुरंधर’चा रहमान डकैत साकारायला अक्षय खन्ना तयार नव्हता; मुकेश छाब्रा यांनी सांगितली पडद्यामागची खरी कहाणी

या अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्रफळ 2 हजार 341.39 चौरस फूट असून त्यात 175.45 चौरस फुटांच्या बाल्कनीचाही समावेश आहे. या व्यवहारासाठी 1.99 कोटी रुपये मुद्रांक शुल्क, तर 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले आहे. अक्षय खन्नाने खरेदी केलेल्या या अपार्टमेंटचा कार्पेट क्षेत्रफळानुसार प्रति चौरस फूट दर अंदाजे 1.42 लाख रुपये आहे. मलबार हिलमधील घरांचा सरासरी अपेक्षित दर प्रति चौरस फूट 85 हजार 200 रुपये असल्याची माहिती स्क्वेअर यार्ड्सच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मात्र, इमारतीचे स्थान, सुविधा आणि घराची वैशिष्ट्ये यांनुसार किमतीत फरक पडतो.