धक्कादायक… कल्याणमधून दोन दिवसांत पाचजण बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण एकीकडे वाढले असतानाच गेल्या दोन दिवसांत कल्याणमधून पाचजण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आंबिवली, खडेगोळवली, नांदिवली तलाव, सूचक नाका परिसरातील पाचजण वेगवेगळ्या घटनांत बेपत्ता झाले आहेत. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. याप्रकरणी खडकपाडा आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आंबिवलीतील साई आयकॉन सोसायटीत राहणारे अमोल चव्हाण हे घरातून निघाले ते परत आलेच नाहीत. मोबाईल चॅटिंगवरून झालेल्या किरकोळ वादानंतर ते घराबाहेर पडल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील प्रकाश दास, कमलादेवी महाविद्यालयातील – विद्यार्थिनी रिया मिश्रा, नांदिवली तलाव परिसरातील राखी गुप्ता – आणि सूचक नाका परिसरातील – नाजमिन खान हे बेपत्ता झाले आहेत. फिरायला जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. कुटुंबीयांनी शोध घेऊनही बेपत्ता – व्यक्तींचा तपास लागला नसल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या.

महाविद्यालयात गेली ती परतलीच नाही

कमलादेवी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिया मिश्रा ही कॉलेजला जाते जाते असे सांगून घराबाहेर – पडली होती. बराच वेळ झाला तरी – ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र – ती कुठेच सापडली नाही. अखेर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.