
कॅनडातील मॉन्ट्रियलजवळ हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर एका खासगी विमान कंपनीचे असल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्नीशमन दलाने एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मॉन्ट्रियलपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर सेंट-ब्रिज्ड-डीइबरविल परिसरात शनिवारी दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळले. अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात हेलिकॉप्टरमधील चौघांचा मृत्यू झाला.
























































