
मध्य प्रदेशातील बैतूलच्या जेएच महाविद्यालयात गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आमच्या मुलीचा मृत्यू हा डीजेच्या मोठ्या आवाजामुळे झाला आहे. त्यामुळे डीजे चालक आणि महाविद्यालयाच्या परिसरात डीजे वाजवण्यास परवानगी देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे.
























































