
एअर इंडियाच्या झ्युरिक-दिल्ली विमान उड्डाणापूर्वी एका वैमानिकावर एअर इंडियाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या वैमानिकाने मद्यपान केलेले असावे असा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी या वैमानिकाला विमानातून उतरवले. तो अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरला असून अद्याप दुसऱ्या एका चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
























































