ट्रेंड – शिस्तप्रिय आई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक खोडकर हत्तीण आणि तिच्या पिल्लाचा एक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत आहे. सॅव्हाना प्रदेशातून जाताना हत्तीण आपल्या पिल्लाची शेपटी सोंडेने हळूच पकडून त्याला आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतेय. हे बघून कोणालाही हसू येईल. या व्हिडीओमध्ये आई आणि मुलाचे प्रेमळ नाते बघायला मिळते. भोवतालच्या कठोर जगात कसे वावरायचे याचे मार्गदर्शन ती हत्तीण आपल्या पिल्लाला करतेय. हा व्हिडीओ @wild_life_guardia हे या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सने ‘आई कोणाचीही असो, ती पूर्ण काळजी घेते’, ‘शिस्तप्रिय आई’, ‘आपल्या पिल्लाचे रक्षण करणारी प्रेमळ आई’ अशा कमेंट्स केल्या आहेत.