असं झालं तर… गुगल खाते डिलीट झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 जर तुम्ही तुमचे गुगल खाते चुपून हटवले असेल तर तुम्ही तुमचे खाते थोडय़ाच वेळात परत मिळवू शकता. तुमच्या ब्राऊझरमध्ये g.co/recover ही लिंक ओपन करा.

2 तुमचा ई-मेल आयडी/लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि Next वर क्लिक करा. माहीत असलेला शेवटचा पासवर्ड टाका. अन्यथा “Try another way” वर क्लिक करा.

3 खाते व्हेरिफाय करण्यासाठी गुगल रिकव्हरी ई-मेल/ रजिस्टर नंबरवर SMS द्वारे एक OTP येईल. तो रिकव्हरी पेजवर टापून नवीन पासवर्ड तयार करा.

4 कोड टाकल्यानंतर नवीन पासवर्डचा पर्याय मिळेल. एक मजबूत पासवर्ड तयार करा. ज्या डिव्हाईसवर तुम्ही हे खाते आधी वापरत होतात, त्याच डिव्हाईसवरून प्रयत्न करा.

5 तुमच्या घरचे किंवा ऑफिसचे वाय-फाय/ मोबाईल नेटवर्प वापरा, जिथून तुम्ही सहसा लॉगइन करता. विचारलेल्या सुरक्षा प्रश्नांची उत्तरे घाई न करता अगदी अचूक देण्याचा प्रयत्न करा.