सिंधुदुर्गात पर्ससीन मासेमारी करणारी नौका जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाचे उल्लंघन करत अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱयांवर सिंधुदुर्ग जिह्यात कठोर कारवाई सुरू आहे. आज सकाळी विजयदुर्ग जेट्टीसमोर तीन वाव पाण्यात अवैध पर्ससीन मासेमारी करताना रत्नागिरी येथील नौका मालक अर्शद अ. लतीफ पावसकर यांची नौका जप्त करण्यात आली. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी देवगड, किरण वाघमारे यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली. नौकेची तपासणी केली असता एकूण 20 परप्रांतीय खलाशी आढळून आले. नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली आहे. अधिनियमांतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.