वाहन अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

रस्ता ओलांडत असणाऱ्या पादचाऱ्याला मोटरसायकलने धडक दिल्याची घटना विक्रोळी येथे घडली. या घटनेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पार्कसाईट पोलसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मृत पादचाऱ्याची ओळख पटली नाही.

तक्रारदार हे पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी ते डय़ुटीवर होते. रात्री एक जण भांडुपच्या खासगी रुग्णालयात एमएलसी (मेडिको लिगल पेपर) घेऊन आला. शुक्रवारी तो मोटरसायकलवरून जात होता. तो एलबीसी रोड येथून जात असताना तेव्हा मृत व्यक्ती हा रस्ता ओलांडत होता. त्याच्या मोटरसायकलची त्याला धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्या जखमीचा मृत्यू झाला. मृताचे वय अंदाजे 46 इतके आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम पार्प साईट पोलीस करत आहेत.