प्रीपेड मोबाईल ग्राहकांना आता 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; ‘ट्राय’ची नवी नियमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल प्रीपेड ग्राहकांना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोठा दिलासा दिला आहे. ‘ट्राय’ने रिचार्जच्या नियमांमध्ये काही बदल केले असून आता ग्राहाकांसाठी संपूर्ण 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे रिचार्ज प्लॅन्स सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सध्या प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी 14 आणि 28 दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे वर्षातून 13 वेळा मासिक रिचार्ज करावा लागतो. आता 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. ज्या ग्राहकांना इंटरनेट किंवा डेटाची गरज नाही अशा ग्राहकांना व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन्स उपलब्ध करून देण्याचेही निर्देश मोबाईल कंपन्यांना देण्यात आले आहेत. यामुळे अनावश्यक डेटा प्लॅन्स खरेदी करावा लागणार नाही.