
आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळ येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे.
आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज पोट साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे.




























































