
भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी एका तरुणाला कानाखाली मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.
मोदी जी, मैं आपको बताता हूँ Gen Z से कैसे जुड़ सकते हो? पर आप ये करोगे नहीं। pic.twitter.com/wnBb0mI0kd
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 28, 2026
“मोदीजी, तुम्ही Gen-Z शी जोडले जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नौटंकी करता. कधी रात्री १२ वाजता उठून रील्स बनवता, तर कधी ‘भजन क्लबिंग’मध्ये जाता. पण तरीही Gen-Z तुमच्याशी जोडली जात नाहीये. कधी विचार केलाय का असं का होतंय? मी सांगतो तुम्हाला. काल रेखा गुप्ता यांच्या सरकारने काही दिवसांपूर्वी टिळक नगरमध्ये एक रस्ता तयार केला होता. काल तिथल्या लोकांनी तो रस्ता हाताने उखडतोय ते दाखवून दिले. तिथे तुमचे मंत्री उपस्थित होते; त्या मंत्र्याने तिथेच एका Gen-Z तरुणाच्या सणसणीत कानशिलात लगावली. मग Gen-Z तुमच्याशी कशी जोडली जाईल? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी या व्हिडीओतून केला आहे.
पुढे ते म्हणाले की, मी तुम्हाला सांगतो Gen-Z शी कसं जोडलं जाऊ शकतं. तरुणाला कानाखाली मारणाऱ्या त्या मंत्र्याला आजच अटक करा. ज्या ज्या लोकांनी तो रस्ता बनवला, भ्रष्टाचार केला, त्यांना अटक करा. मग बघा, तुम्हाला रात्री १२ वाजता रील्स बनवण्याची गरज पडणार नाही, भजन क्लबिंगमध्ये जाण्याची गरज पडणार नाही; संपूर्ण देशातील Gen-Z तुमच्याशी जोडले जातील. पण तुम्ही ते करणार नाही! तुम्ही तुमच्या मंत्र्याला वाचवाल. मला सांगण्यात आलंय की, दिल्ली पोलिसांना वरून आदेश आहेत की त्या मंत्र्याला वाचवायचं आहे. तुम्ही मंत्र्याला वाचवणार, भ्रष्टाचाऱ्याला वाचवणार, आणि मग विचार करणार की या देशातील Gen-Z तुमच्याशी जोडले जातील? या देशातील Gen-Z तुमच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करतो, स्पष्टवक्तेपणाची अपेक्षा करतो, सचोटीची अपेक्षा करतो, असे केजरीवाल म्हणाले.
विरोधकांवर ईडी-सीबीआय, तर जनतेवर लाठ्या आणि गोळ्या! मल्लिकार्जुन खरगे यांचा सरकारवर हल्लाबोल























































