3 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर, गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिली. शरद पवार हे दुष्काळी दौऱयावर आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. हा कार्यक्रम आधी 24 ऑक्टोबरला होणार होता. परंतु कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून हा कार्यक्रम आता 3 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये 9 फुटी आणि 4 टन वजनाचा गौतम बुद्धांचा पुतळा नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठीच ते बारामती येथे येणार असून याबाबत पंतप्रधान कार्यालयाने पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, गौतम बुद्धांच्या पुतळ्याबरोबर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसह 13 महामानवांचे चित्रही येथे असणार आहेत.