
अनेक कुटुंबांकडे बरीच वर्षे जुनी मालमत्तेची कागदपत्रे असतात. जुन्या जमिनीची कागदपत्रे हरवली तर तुमच्या राज्याच्या अधिकृत जमीन नोंदीची माहिती पोर्टलवर तपासू शकता.
अनोळख्या वेबसाईटऐवजी आपल्या राज्याच्या अधिकृत भू-अभिलेख किंवा महसूल विभागाच्या वेबसाईटचा वापर करा.
तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरवर क्रोम उघडा. गुगलमध्ये राज्याचे नाव टाईप करा, भूलेख/ भू-अभिलेख किंवा महसूल विभाग सर्च करा. भू-अभिलेख पाहण्याचे पर्याय दिसतील.
जिल्हा, तहसील आणि गावाची माहिती भरा. जमिनीच्या ठिकाणाची माहिती निवडा, ज्यामध्ये प्रथम जिल्हा, नंतर तहसील किंवा विभाग आणि त्यानंतर गावाच्या नावाचा पर्याय निवडा.
आजोबा किंवा पणजोबांचे नाव शोधा. खातेदाराचे नाव, खसरा क्र., खाते क्र. /खतौनी क्रमांकाद्वारे नोंदी शोधा. जुन्या नोंदी तहसील, मंडळ/ महसूल कार्यालयातून मिळवू शकता.


























































