
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्ये असलेल्या नेहरू पार्कचे नूतनीकरण केले जात आहे. नेहरू पार्क हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे याचे नूतनीकरण केले जात आहे. या ठिकाणी बगीचा केला जात असून वेगवेगळी फुलझाडे लावण्याचे काम केले जात आहे. रात्री विजेचा झगमगाट असावा यासाठी खास व्यवस्था केली जात आहे. वृद्धांना बसण्यासाठी बेंच आणि छोटय़ा मुलांसाठी वेगवेगळे साहित्य या ठिकाणी ठेवले जात आहे, अशी माहिती पीएचएचे महासंचालक अहमद उस्मान जावेद यांनी दिली.



























































