असं झालं तर… पासपोर्ट हरवला किंवा खराब झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

1 पासपोर्ट हरवला किंवा चोरीला गेला असेल तर सर्वात आधी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्वरित तक्रार नोंदवा आणि त्याची मूळ प्रत सुरक्षित ठेवा.

2 पासपोर्ट कसा आणि पुठे हरवला, याचा तपशील देणारे शपथपत्र (Affidavit) तयार करा. जुन्या पासपोर्टची प्रत असल्यास पोलीस रिपोर्टसह ऑनलाईन अर्ज करा.

3 जर पासपोर्ट गंभीरपणे खराब झाला असेल तर सामान्य प्रक्रियेद्वारे अर्ज करावा लागेल आणि जुनी पासपोर्ट पुस्तिका, लिखित स्पष्टीकरण अर्जासोबत जमा करावी लागेल.

4 पासपोर्ट सेवा भारत पोर्टलवर जाऊन नवीन पासपोर्टसाठी ‘Apply for Background Verification/Re-issue of Passport’ हा पर्याय निवडा.

5 कारणामध्ये ‘Lost’ किंवा ‘Damaged’ निवडून योग्य ती माहिती भरा. शुल्क भरून अपॉइंटमेंट बुक करा आणि ठरलेल्या दिवशी मूळ कागदपत्रांसह पासपोर्ट सेवा केंद्रात जा.