एमडीआर शुल्काविरोधात आज व्यापाऱ्यांचा ‘नो यूपीआय डे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने 2 हजार रुपयांवरील यूपीआय पेमेंटवर 15 ऑक्टोबरपासून एमडीआर शुल्क लावण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने 2 ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 150हून अधिक व्यापारी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.

सध्या यूपीआय व्यवहारांसाठी व्यापाऱयांकडून ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर) आकारला जात नाही. मात्र 15 ऑक्टोबरपासून 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शुल्कामुळे व्यापाऱ्यांचा मोठा तोटा होईल, असे व्यापारी संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा किंवा ‘झिरो एमडीआर’ व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, दिल्ली यांसह अनेक राज्यांतील संघटना यात सहभागी होणार आहेत.