Helicopter Crash – झिम्बाब्वेमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, उद्योगपतीसह सहा जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झिम्बाब्वेमध्ये हेलिकॉप्टर कोसळून एका उद्योगपतीसह सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. हरारेच्या आग्नेयेस असलेल्या मारोंडेरा जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळी हेलिकॉप्टर कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवर कोसळताच हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी आणि दोन कर्मचारी होते. मृत प्रवाशांमध्ये झिम्बाब्वेमधील एका बड्या उद्योगपतीचा समावेश आहे, असे बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मृतांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.