
अंधेरी येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात पार पडलेल्या नवव्या आशिया कप इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप 2026 मध्ये शितो र्यु स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन (एसएसकेकेए) च्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत 12 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कांस्य अशी एकूण 43 पदके पटकावली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ‘एसएसकेकेएने प्रथम क्रमांकाचा चषक आपल्या नावे केला. भारतासह मलेशिया, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतील सुमारे 1200 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
सुवर्णपदकांची चमक ः मो. जिदान खान (दुहेरी), माहिरा तळेकर (दुहेरी), रियांश पटवर्धन (दुहेरी), ग्रीशम पटवर्धन, माही पायलकर आणि रोशन शेट्टी यांनी सुवर्णपदक पटकावत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
रौप्यपदकांची दमदार कामगिरी ः पूर्वा मोरे (दुहेरी), अश्विनी जांबले, मंजिरी खिडबिडे, पार्थ जोगळे, अथर्व राणे, सिद्धेश आगवणे, हर्षित राऊळ आणि अद्विक आगवणे यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
कांस्यपदकांची भक्कम भर ः वेदांत नेटके (दुहेरी), सानवी करांडे (दुहेरी), शांभवी कुलकर्णी (दुहेरी), सानिधी करांडे, आयुष करांडे, स्वरा टेंबुलकर, शिद्धत गुप्ता, सार्थक काळे, अलभ्य सावंत, अद्विक आगवणे, क्षितिजा हांडा, मंजिरी खिडबिडे, माही पायलकर, अश्विनी जांबले, ग्रीशम पटवर्धन, रोशन शेट्टी, पार्थ जोगळे आणि सिद्धेश आगवणे यांनी कांस्यपदक मिळवत संघाच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
या सर्व खेळाडूंना शिहान उमेश मुरकर आणि सेन्सेई विघ्नेश मुरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तर या स्पर्धेचे व्यवस्थापन क्योशी संजय गव्हाळे यांनी केले. ‘एसएसकेकेए’च्या या शानदार यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, पालक, व्यवस्थापन तसेच या खेळाडूंच्या यशामध्ये गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्टने दिलेले क्रीडा साहित्य व प्रशिक्षणासाठी केलेले मोलाचे सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
























































