
हिंदुस्थानने बॉक्सिंग रिंगमधून आणखी एक पदक देशाला मिळवले आहे. पुरुषांच्या 90 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानचा कपिल पोखरिया उझबेकिस्तानच्या तुराबेक हबीबुल्लायेवकडून 1-4 ने पराभूत झाला. कपिलने रिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली, पण उझबेकिस्तानच्या बॉक्सरने अचूक आणि प्रभावी ठोसे मारून स्प्लिट डिसिजनने विजय मिळवला. उपांत्य फेरीतील या पराभवाने कपिलचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.
























































