
ICC Men’s World Cup 2027 चे बिगुल वाजले असून उद्या, 1 ऑक्टोबर 2026 रोजी स्वर्धेचे वेळापत्रक दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात जाहीर केले जाणार आहे. पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबर 2027 रोजी या विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. 21 नोव्हेंबर 2027 रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. मात्र, याचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे क्रिक्रेट प्रेमी या वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा गुरुवारी संपुष्टात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश या स्पर्धेचे सह-यजमान असणार आहेत.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, उद्या स्पर्धेच्या वेळापत्रकासह स्पर्धेच्या तिकीट विक्रीसाठी नोंदणीचा शुभारंभ सुद्धा केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आपआपल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी अपेक्षित वेळ मिळणार आहे. त्याचबरोबर या विश्वचषकासाठी संघ निवडण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे दोन देश स्पर्धचे यजमान असल्यामुळे थेट पात्र ठरले आहेत. या दोन संघांव्यतिरिक्त हिंदुस्थान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान हे संघ सुद्धा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, वेस्ट इंडिजच्या चाहत्यांना कठीण परीक्षा पार करावी लागणार आहे. संघ क्रमवारीत पिछाडीवर पडल्यामुळे वेस्ट इंडिजचला पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात 14 संघ सहभागी होणार असून, गटफेरीपूर्वी तीन टप्प्यांचा समावेश असणार आहे. स्पर्धेची सुरुवात एका ‘सुपर सिरिज’ने होईल, ज्यामध्ये पात्र ठरलेल्या संघांपैकी तळाचे तीन संघ एकमेकांविरुद्ध राउल-रॉबिन पद्धतीने सामने खेळतील. त्यानंतरचे चार संघ पात्रता फेरीच्या माध्यमातून निश्चित केले जातील. दरम्यान, तिकीट विक्री थेट खुली होणार नसली, तरी क्रिकेटप्रेमींना गुरुवारपासून अधिकृत तिकीट बॅलटसाठी आपली नोंदणी करता येणार आहे. जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट नेटवर्कवर रात्री 8.30 वाजता याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.























































