
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हिंदुस्थानची सुवर्ण घोडदौड सुरू आहे. हिंदुस्थानी नेमबाजांनी चमकदार कामगिरी कायम ठेवत सुवर्णपदकावर निशाणा साधला आहे. बुधवारी तिरंदाजीमध्ये दोन सुवर्णपदक आल्यानंतर मिक्स ट्रॅप प्रकारातही नीरू ढांडा आणि कायनान चेनाई या हिंदुस्थानी जोडीने अचूक लक्ष्यवेध करत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी तब्बल 5 सुवर्णपदकं जिंकली आहेत.
बुधवारी आयची प्रेफॅक्चरल जनरल शूटिंग गॅलरी येथे पार पडलेल्या ट्रॅप मिक्स टीम प्रकारात हिंदुस्थानच्या नीरू ढांडा आणि कायनान चेनाई या जोडने सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या हिंदुस्थानी जोडीने अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. कतारच्या संघाला 32 गुणांसह रौप्य, तर चीनच्या संघाला 23 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Asian Games 2026 | Indian pair Neeru and Kynan Chenai win the gold medal with an Asian Record of 34 out of 40 shots in the final of Trap Mixed Team shooting event
This is India’s first-ever gold medal in Trap Mixed Team event. pic.twitter.com/TP1dGru8l5
— ANI (@ANI) September 30, 2026
नीरूच्या पदकांची हॅटट्रिक
दरम्यान, या ऐतिहासिक विजयामुळे नीरू ढांडा हिने चालू आशियाई खेळांमध्ये पदकांची हॅटट्रिक साजरी केली आहे. यापूर्वी तिने महिलांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले होते, तर ट्रॅप शूटिंगच्या वैयक्तिक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून अशी कामगिरी करणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला नेमबाज ठरली होती. आता कायनान चेनाईसोबत मिळून सुवर्णपदक जिंकल्याने नीरूच्या खात्यात दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण तीन पदके जमा झाली आहे.
ती आजारी होती, पण… रुग्णालयातून रेंजवर अन् रेंजवरून नीरूने इतिहास रचला

























































