
हिंदुस्थानी वंशाचे अवघ्या 36 वर्षाचे अंगद सिंग ढिल्लन यांची संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) कॅनडाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. अंगद सिंग ढिल्लन हे मूळचे पंजाबमधील आहेत. ढिल्लन यांनी कॅनडाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार ते दोन केंद्रीय मंत्र्यांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून अंगद सिंग ढिल्लन यांनी काम पाहिलेले आहे.
गोल्डी ब्रार मोस्ट वॉन्टेड यादीत
वॉशिंग्टन ः अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने गँगस्टर सतिंदरजीत सिंह उैर्फ गोल्डी ब्रार याचा टॉप 10 मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समावेश केला आहे. ब्रारची माहिती देणाऱयाला 10 लाख डॉलरचे बक्षीसची घोषणा केली आहे. ब्रारला लॉरेन्स ऑर्गनाइज्ड क्राइम ग्रुपचा उत्तर अमेरिकेतील प्रमुख ऑपरेशनल लीडर आहे. लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्यावर 2023 मध्ये खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप आहे.
सोने-चांदीत घसरण सुरूच
नवी दिल्ली ः सोने आणि चांदीत आज पुन्हा घसरण झाली. अवघ्या दोन दिवसात सोने 5 हजार रुपयांनी तर चांदी 11 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोने 580 रुपयांनी स्वस्त झाले असून एक तोळा सोने 1 लाख 47 हजारांपर्यंत खाली आले आहे. तर एक किलो चांदी 1 हजार 373 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 22 हजारांपर्यंत खाली आली. सप्टेंबरमध्ये सोने 9 हजार, चांदी 15 हजारने स्वस्त झाली आहे.
डोंगरकडा कोसळून 14 ठार
काठमांडू ः नेपाळच्या मुस्तांग जिह्यातील एका डोंगराचा भाग कोसळून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात खडक-मातीचा संपूर्ण ढिगारा काही सेकंदांतच उतारावरून खाली येताना दिसत आहे. पाहता पाहता नदीचा प्रवाह मलब्याने भरून गेला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. नेपाळ एका महिन्यात दुसऱयांदा भीषण पुराचा सामना करत आहे.


























































