असं झालं तर… आरोग्य विम्याची कॅशलेस मंजुरी अडकली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅशलेस मंजुरी म्हणजे उपचारादरम्यान रुग्णालयाचे बिल थेट विमा कंपनीकडून भरले जाणे. ती अडकल्यास रुग्णालयाच्या इन्शुरन्स डेस्कशी संपर्क साधा.

2 आयआरडीएआयनुसार उपचारांसाठी एक तास/आपत्कालीन स्थितीत तीन तासांत निर्णय होणे बंधनकारक आहे. हॉस्पिटलच्या विमा कक्षाला कंपनीवर दबाव टाकण्यास सांगा.

3 रुग्णालयाच्या डेस्कला अतिरिक्त  कागदपत्रे किंवा डॉक्टरांचे स्पष्टीकरण त्वरित पाठवण्यास सांगा. उशीर झाल्यास विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून कारण विचारा.

4 क्लेम का अडकला आहे याबद्दल थेट कंपनीकडून माहिती घ्या. अनेकदा ‘Pre-existing disease’ किंवा अपुऱ्या माहितीमुळे मंजुरी थांबते.

5 मंजुरी न मिळाल्यास उपचार सुरू ठेवण्यासाठी सध्या स्वतः बिल भरा आणि डिस्चार्जच्या वेळी रिइंबरमेंटसाठी अर्ज करा. सर्व डिस्चार्ज कागदपत्रे, पावत्या सुरक्षित ठेवा.