रशियाविरुद्धच्या युद्धात युव्रेनने उतरवले रोबो; तीन हजार सैनिकांना मारल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात आता युक्रेनने थेट रोबोट सैनिकाला उतरवले आहे. युक्रेनने पहिल्यांदाच जमिनीवर आत्मघाती रोबोटचा वापर करून रशियन सैन्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ‘ऑपरेशन विवाल्डी’अंतर्गत रोबोट आणि ड्रोनच्या मदतीने रशियाच्या सुमारे तीन हजार सैनिकांना ठार करण्यात आले. तसेच पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क प्रदेशातील पाच गावे आणि तीन वसाहतींवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आले, असा दावा युव्रेनकडून करण्यात आला आहे.

‘ऑपरेशन विवाल्डी’ ही मोहीम मे महिन्यात सुरू झाली. ती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पूर्ण झाली. सैन्याने याची माहिती आता सार्वजनिक केली. या काळात रोबोटने 15,700 हून अधिक मोहिमा पूर्ण केल्या. या ऑपरेशनमध्ये चारचाकी रोबोटचा वापर करण्यात आला. त्यामध्ये स्फोटके भरलेली होती.

रोबोटमध्ये बसवलेल्या पॅमेऱयाद्वारे आसपासच्या परिसरावर नजर ठेवली जात होती. त्यांच्या मदतीने रशियन सैन्याच्या कमांड सेंटरवर, सैनिकांच्या तळांवर, शस्त्रs आणि साहित्य ठेवण्याच्या ठिकाणांवर तसेच नदी पार करण्याच्या मार्गांवर हल्ले करण्यात आले. या रणनीतीचा उद्देश युव्रेनी सैनिकांचे जीव धोक्यात न घालता रशियन ठिकाणांवर हल्ला करणे हा होता. युव्रेन जगात पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून रोबोटला शत्रूच्या प्रदेशात उतरवून हल्ला करत आहे, असे थर्ड आर्मी का@र्प्सचे कमांडर जनरल आंद्री बिलेत्स्की यांनी सांगितले.