
कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली वाढ, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली शेअर्सची विक्री आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची होत असलेली घसरण यामुळे सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार जबरदस्त कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टीत झालेल्या प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जबर फटका बसला असून त्यांना तब्बल आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
30 शेअर्सचे इंडेक्स सेन्सेक्स 1.52 टक्के म्हणजेच 1124 अंकांनी घसरून 72,771 अंकांवर बंद झाला. तर 50 शेअर्सचे निफ्टी 1.56 टक्के म्हणजेच 360 अंक घसरून 22,780 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील लार्सन अॅण्ड टुब्रो, पॉवरग्रीड, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर या पंपन्यांचे शेअर्स घसरले तर इन्फोसिसच्या शेअर्समध्ये वाढ झाली. सोमवारी मार्केट बंद झाले त्यावेळी गुंतवणूकदारांचे जवळपास आठ लाख कोटी रुपये बुडाले. यामुळे एपूण मार्पेट पॅप आता 474 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.


























































