
डंकी रुटने म्हणजेच बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेला जात असलेल्या तीन हिंदुस्थानी नागरिकांचे इथिओपियामध्ये अपहरण करण्यात आले. हे तिन्ही नागरिक गुजरातचे रहिवाशी असून यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. हे तिघेही 20 सप्टेंबर रोजी गुजरातहून निघाले होते. इथिओपियात पोहोचताच या तिघांचे अपहरण करण्यात आले.
तिघांचेही फोन बंद
ऋत्विक, ममता आणि आणखी एका मुलीच्या पुटुंबीयांनीही अपहरणकर्त्यांना 1 कोटी रुपयांची खंडणी दिली आहे. मात्र पैसे दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. तिघांचेही मोबाईल बंद आहेत. त्यामुळे आता कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एजंट अल्पेश पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




























































