पूजाने उंच उडीत पटकावले कांस्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या पूजा सिंगने महिलांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत 1.84 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक जिंकले. तिने 1.84 मीटरपर्यंतची उंची एकाच प्रयत्नात पार केली, पण पूजा तिन्ही प्रयत्नांमध्ये 1.87 मीटरचा टप्पा पार करू शकली नाही. उझबेकिस्तानच्या सैफुल्लायेवा आणि कझाकस्तानच्या ओव्हचिनिकोवा यांनी अनुक्रमे 1.87 मीटरची उंची पार करून सुवर्ण आणि रौप्यपदके जिंकली. पूजाने संपूर्ण अंतिम फेरीत संयमी कामगिरी दाखवत हिंदुस्थानच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली.