CJP च्या आंदोलनाला पाठिंबा; अभिजित दीपके यांनी मानले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या २ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या महत्त्वपूर्ण पाठिंब्याबद्दल सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.

अभिजित दीपके यांनी X वर एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. आपल्या पोस्टमध्ये भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “२ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. आपली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व हिंदुस्थानींनी एकत्र येणे गरजेचे आहे.”