पितृपक्षात श्राद्ध विधीदरम्यान दुर्घटना, एकाच कुटुंबातील पाच जणांचा नदीत बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पितृपक्षात श्राद्ध कार्यक्रमासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये बाप-लेक, भाचा, पुतण्या आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने सर्वांना पाण्यातून बाहेर काढले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सुखनई नदी किनारी श्राद्ध कार्य सुरू असताना एकाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी अन्य सदस्यही पाण्यात उतरले आणि सर्वच बुडाले. सर्वांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.