
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंजर्ले कड्यावरील गणपती मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे मिनी महाबळेश्वर अर्थात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. अशा या दापोलीतील आंजर्ले येथील कडयावरील गणपती देवस्थान हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. या कड्यावरील गणपती देवस्थानामुळे आंजर्ले गावात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे.
आंजर्लेत पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे हमखास करून आंजर्लेतील सुप्रसिद्ध कड्यावरील गणपती मंदिरात देवदर्शनासाठी जातातच जातात. त्यामुळे येथे देव दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसोबतच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या देवस्थानचे स्थान महात्म्य अधिक वाढले आहे.



























































