
पराठा चविष्ट करण्यासाठी, कणकेमध्ये किसलेला उकडलेला बटाटा मिसळा.
तेल किंवा तुपाऐवजी लोण्यामध्ये पराठा भाजल्यास त्याची चव अधिक वाढते.
पीठ मळताना पाण्याऐवजी दूध किंवा 2-3 चमचे ताजे दही वापरा. यामुळे पराठे खूप मऊ होतात.
पीठ मळल्यानंतर त्याला कपडय़ाने झाकून 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि पराठे लाटायला सोपे जातात.



























































