
केटामाईन तस्करीप्रकरणी दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अदनान अहमद नियाज सिद्धिकी आणि सौद मुश्ताक मणियार अशी त्या दोघांची नावे आहेत. त्याच्याकडून जप्त केलेल्या केटामाईन ड्रगची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 37 कोटी 17 लाख रुपये इतकी आहे.
एमआयडीसी पोलिसांचे पथक अंधेरी पुर्ला रोड येथे गस्त घालताना दोन जण संशयास्पद फिरताना दिसले. वरिष्ठ निरीक्षक घनश्याम नायर याच्या पथकातील सहायक निरीक्षक उल्हास खोलम, येडगे, शिंगाणे, बडे, ठोंबरे आदींच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली. त्यात केटामाईन ड्रग आणि दोन मोबाईल आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून 12 किलो 390 ग्रॅम केटामाईन ड्रग जप्त केले. जप्त केलेल्या ड्रग किंमत सुमारे 37 कोटी 17 लाख रुपये इतकी आहे. ड्रग तस्करी प्रकरणी त्या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला.


























































