
मराठा आंदोलकांचा मुद्दाम छळ करण्यात येत आहे. मला एकटे पाडण्यात येत आहे. कितीही छळ करा, त्रास द्या, पण मी सरकारला शरण जाणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सुनावले.
अकरावे आंदोलन स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांना उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज रुग्णालयातूनच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही लोळागोळा होऊन शरण यावे अशी सरकारची आसुरी महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी मराठा आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जाणूनबुजून त्रास देण्यात येत आहे. सरकारने कितीही त्रास दिला, छळ केला तरीही मराठे जातिवंत आहेत, ते शरण जाणार नाहीत, असे जरांगे यांनी सरकारला सुनावले.



























































