‘सीबीएसई’ सहावीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून सूट, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सीबीएसई’ सहावीच्या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून सुटका मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्रिभाषा धोरणाच्या सुनावणीदरम्यान हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता सातवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सहावीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात त्रिभाषा धोरणावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पेंद्र सरकारची भूमिका मांडली. सहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट देण्यास सरकार इच्छुक नसल्याचे ते म्हणाले. सीबीएसईच्या 2800 शाळांपैकी 99 टक्के शाळांनी त्रिभाषा धोरण स्वीकारले असून आवश्यक सुविधा असल्याचा दावाही करण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अचानक असा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे असे सांगत सहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला.