
एकटे घराबाहेर पडलेले जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी जिओने आता ‘जिओशील्ड’ (JioShield) हे नवे फिचर लाँच केले आहे. या फीचर्सच्या मदतीने त्यांच्या फोनची बॅटरी, लाईव्ह लोकेशन ट्रकिंग, गरजेच्या वेळी SOS अलर्ट, स्क्रीन टाइम तसेच ऑनलाइन सुरक्षिततेसाठी अॅप आणि कॉण्टॅक्ट कंट्रोल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘जिओशील्ड’ मोबाईलमध्ये सेट करणेही सोपे आहे. पालकांच्या फोनमध्ये ‘JioThings’ आणि मुलांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या फोनमध्ये ‘JioShield’ अॅप इन्स्टॉल करावे लागेल. दोन्ही अॅप्स एकमेकांशी जोडल्यावर पालकांना त्यांच्या फोनवरून सर्व सुविधांचे व्यवस्थापन करता येणार आहे. अॅपच्या माध्यमातून पालकांना मुलांचे लोकेशन, आवश्यक सेफ्टी अलर्टसह फोनची बॅटरी कमी झाल्यास त्याचेही अलर्ट मिळणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ पालकांशी संपका&त राहण्यासाठी आणि वेळेवर मदत करण्यासाठी या सुविधेचा उपयोग करता येणार आहे.
ऑफर 1 ऑक्टोबरपासून उपलब्ध
अॅपसाठी मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या फोनमध्ये Android 10 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे आणि सक्रिय जिओ नंबर असणे आवश्यक आहे. पालकांसाठी JioThings सध्या Android वर उपलब्ध असून iOS वर ते 1 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार असल्याचे जिओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

























































