
कुगेन हा एक हस्की जातीच्या कुत्र्याचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. चीनमध्ये मालक झूसोबत कुगेन राहतो. दृष्टी नसल्याने तो फक्त वासानेच अन्न ओळखण्याच्या सवयीमुळे प्रसिद्ध आहे. कुगेनला मालक काही पदार्थ खायला देतो, मात्र तो निरखून वास घेतो आणि खाणे नाकारतो. जेव्हा मालक त्याला ताजे मांस खायला देतो तेव्हा तो त्या मांसावर झडप घालतो. हा व्हिडीओ @blindpupkugen या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कुगेनचे हावभाव, त्याचा तटस्थपणा बघून अनेकांना हसू फुटते. हा व्हिडीओ 50 हजारांहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी कुगेनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.


























































