
महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नरेंद्र पवार फरार असून त्याने भिवंडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी होऊन न्यायाधीश ए. ए. कारंडे यांनी पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
कल्याण पश्चिम येथील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील याने पीडित महिलेचे कौटुंबिक प्रकरण मिटवण्यासाठी भिवंडी येथील एका फार्महाऊसवर बोलावले होते. याठिकाणी गुंगीचे औषध देऊन नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांनी पीडित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. पीडित महिलेने याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच नरेंद्र पवार फरार झाला आहे.
अटकेची टांगती तलवार
नरेंद्र पवार याचा अटकपूर्व जामीन आज भिवंडी न्यायालयाने फेटाळला. सुनावणीदरम्यान न्यायालयात फक्त तक्रारदार पीडित महिला उपस्थित होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नरेंद्र पवार याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.





























































