Asian Games मध्ये हिंदुस्थानचा ‘सुवर्ण’षटकार; महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने तिरंगा फडकावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने 4 बाय 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. किरन, मचेतिरा पुवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज या चोघींनी संबंध हिंदुस्थानाची मान अभिमानाने उंचावली आहे. 3 मिनिटे 29.69 सेकंदात त्यांनी शर्यंत पूर्ण केली आणि सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. विशेष म्हणजे या स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे पहिलेच अॅथलेटिक्स सुवर्णपदक ठरले आहे.

अंतिम फेरीची लढत अतिशय चुरशीची होती. मात्र, संयम, अचूक लक्ष्य, एकमेकिंनी साधलेला योग्य ताळमेल आणि अनेक वर्षांच्या मेहनतीच्या जोरावर हिंदुस्थानच्या या संघाने नेत्रदिपक कामगिरी केली. अंतिम फेरीत उत्कृष्ट वेग राखत बहरीन संघाला मागे टाकलं आणि सर्वोत्तम वेळ नोंदावर सुवर्णपदकाची कमाई केली. बहरीन संघाने 3 मिनिटे 30.21 सेकंदाची वेळ नोंदवली आणि त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानाव लागलं. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्या रामराजने हे दुसरे पदक ठरले आहे. तिने यापूर्वी स्पर्धेत 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते.