महापालिकेच्या शालेय दैनंदिन पुस्तिकेतून डॉ. आंबेडकरांना वगळले, भीमसैनिक संघटनेकडून संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - रुपेश जाधव

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी वितरित करण्यात येत असलेल्या दैनंदिन पुस्तिकsत (स्पुल डायरी) यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या डॉ. आंबेडकरांनी  देशातील शाषित पीडित, वंचित घटकांना शिक्षणाचा समान अधिकार मिळवून दिला त्यांनाच या पुस्तिकेतून वगळण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क बनावा यासाठी आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा युगपुरुषाचे छायाचित्र वगळल्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे याप्रकरणाची त्वरित चौकशी करावी अन्यथा मुंबईसह महाराष्ट्रभर विविध पक्ष संघटना, आंबेडकरी संघटना यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीमसैनिक संघटनेच्या वतीने सदस्य प्रशांत जाधव यांनी दिला आहे. याबाबत भीमसैनिक संघटनेने पालिकेच्या शिक्षण विभागासह विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडे तक्रार केली आहे.