डोकेदुखीने हैराण आहात? हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामान्य डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. शरीरात पाणी कमी झाल्याने (डिहायड्रेशन) डोकेदुखी वाढू शकते.

कपाळावर किंवा मानेवर थंड किंवा गरम कापडाने शेक दिल्यास आराम मिळतो. अंधाऱ्या किंवा
कमी प्रकाश असलेल्या शांत खोलीत काही वेळ पडून राहा.

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रीनकडे सतत पाहणे टाळा, ज्यामुळे डोळय़ांवरील ताण कमी होईल.