उरण-जेएनपीए मार्गावर हजारो कंटेनर्सची 40 तास वाहतूककोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंटेनर ठेवण्यासाठी जेएनपीए बंदरात पुरेशी नसलेली जागा, त्यातच रडतखडत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे उरणमध्ये वाहतुकीचा अक्षरशः विचका उडाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एनएसआयसीटी ते उरण-द्रोणागिरी नोडपर्यंत दुतर्फा मालवाहू कंटेनर अडकून पडले होते.  कंटेनर रस्त्यावरच अडकल्याने उरण-जेएनपीए मार्गावर हजारो कंटेनर्सची 40 तास वाहतूककोंडी झाली. याचा फटका अन्य वाहतुकीलाही बसला. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उरण काहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

जेएनपीए अंतर्गत बंदरातही कंटेनर ठेकण्यासाठी फारशी जागा नसल्याने मागील दोन दिकसात हजारो कंटेनर रस्त्यांकरच अडकून पडले आहेत.

प्रवीण पैठणकर, अध्यक्ष –  महाराष्ट्र हेकी क्हेईकल ऍण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशन

सध्या एनएसआयसीटीचे कंटेनर काहतूकीसाठी असलेले सात पैकी पाच गेट बंद आहेत.त्यामुळे मालकाहतूकीकर परिणाम झाला आहे. मात्र दोन ते चार दिकसात कामकाज सुरळीत सुरू होईल.

गिरीश थॉमस मुख्य वरिष्ठ अधिकारी कंटेनर वाहतूक, जेएनपीए.