गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची बेकायदा वाहतूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱया गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची बेकायदा वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेटा इंडियाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीएसएमटी स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. गाडीच्या मालडब्यात ‘बजरीगर’, ‘फिंच’ व ‘कॉकटेल’ या प्रजातींचे सुमारे 2,100 पक्षी अत्यंत अरुंद जागेत कोंबलेले होते. हे पार्सल पुर्ला येथील एका दुकानात स्वाधीन करण्यात आले होते. पोलिसांनी त्या दुकानावर छापा टापून 337 पक्षी जप्त केले. त्यापैकी 55 पक्ष्यांचा गुदमरून मृत्यू झाला.