
वकिलाच्या घरी दहा लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी मोलकरणीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे अटक महिला ही गेल्या वर्षभरापासून घरकाम करते. वीस दिवसांपूर्वी तक्रारदार याने त्याच्या मुलीच्या प्रवेशासाठी दहा लाख रुपये आणले होते. त्याने ती रक्कम त्याच्या आईवडिलांच्या घरी ठेवली होती. दुसऱया दिवशी त्याची बहीण ती रक्कम घेण्यासाठी गेली होती; मात्र तिला रक्कम मिळून आली नाही. याची माहिती त्याच्या बहिणीने त्यांना पह्नवरून दिली. याप्रकरणी त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

























































