‘ब’ श्रेणीतील अनुकंपा नोकरी 2020 नंतरच, हायकोर्टाचा निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी सेवेतील ‘ब’ श्रेणीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंपा नोकरी देणाचा नियम 2020 नंतर लागू होईल. याची पूर्वलक्षीप्रभावाने अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

‘ब’ श्रेणीतील एका सरकारी कर्मचाऱ्याचे 2019 मध्ये निधन झाले. त्याच्या जागी अनुकंपा नोकरी मिळावी यासाठी मुलाने अर्ज केला. हा अर्ज नाकारण्यात आला. मात्र 2021 मध्ये राज्य शासनाने एक निर्णय जारी केला आहे. त्यानुसार याचा लाभ मला मिळावा, यासाठी मुलाने न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. सुमन शाम व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन ‘ब’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी पूर्वलक्षीप्रभावाने करून याचिकाकर्त्याला याचा लाभ देता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळली.